डॉ सुभाष गवई हे विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सुपरिचित असे नाव आहे. अमरावती येथील भारतीय महाविद्यालयात २६ वर्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख व विद्यार्थ्याच्या विकास तळमळ असणारे सर म्हणून सर्व प्रिय राहिले आहेत . भारतीय संविधानाचे अभ्यासक असणारे डॉ सुभाष गवई राजकीय सामाजिक , सांस्कृतिक , साहित्यिक कार्यात तितकेच अग्रेसर आहेत . आपल्या विचार क्षमतेचे शब्दात रुपांतर करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले असल्याने ते एक यशस्वी वक्ता आणि पत्रकार सूद्धा आहेत . महाराष्ट्रातील वृत्तपत्रातून , विविध मासिकातून , विविध विषयावरील त्यांचे लेखान एवढाच त्यांच्या लिखाणाचा आवाका नाही तर त्याही पुढे जाऊन त्यांनी कुष्ठ रुग्णांच्या , अंध-अपंगाच्या विषयावर, समस्यांवर तितकेच ओजस्वी व परखडपणे लिहिले आहे. त्यांच्या संवेदनशील मनाचीच ही साक्ष होय . विध्यापिठाच्या अभ्यासक्रमासोबतच इतरही विषयांवरील त्यांची आतापर्यंत २१ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील पाच पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागली आहेत.